कावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

पूर परिस्थिच्या पुनर्वसनासाठी 20 ऑगस्टला पक्षातर्फे सरकारला निवेदन देण्यात येईल. शासनाने मदत केली, तर ठीक नाहीतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुंबई : ''जे लोक खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्ष गळती होत आहे. पण, तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आपण सर्वांनी कावळ्यांची चिंता करायची नाही, तर मावळ्यांची चिंता करायची," असा सल्ला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला.

पूर परिस्थिच्या पुनर्वसनासाठी 20 ऑगस्टला पक्षातर्फे सरकारला निवेदन देण्यात येईल. शासनाने मदत केली, तर ठीक नाहीतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला विभागाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत संबोधीत करताना शरद पवार पुढे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्ष विचार करेल.विधानसभा निवडणुकीत तरुणांना आणि महिलांना पुढाकार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

देश चहूबाजूनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटना मजबुत असणे गरजेचे आहे. यातून पक्षाला आणि देशालाही फायदा होईल. राज्यात पूरपरीस्थीतीनंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. मात्र, आपल्या पक्षाने सर्वाधिक मदत केल्याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षांच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

नागपुर गुन्हेगारीचे केंद्र 
महाराष्ट्राची दुसरी राजधानी आज गुन्हेगारीचे केंद्र झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथलेच आहेत. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल आपण आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President Sharad Pawar comment on BJP and CM Devendra Fadnavis