Photo : उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

मुंबई - गेल्या काही दिवसात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रातील प्रचंड रोषामुळे भाजपचे प्रवक्ते आणि नेते प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेत असल्याचं देखील ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. या पुस्तकाबाबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येतायत. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

मुंबई - गेल्या काही दिवसात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रातील प्रचंड रोषामुळे भाजपचे प्रवक्ते आणि नेते प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेत असल्याचं देखील ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. या पुस्तकाबाबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येतायत. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता अनेकांवर टीका केली.  यामध्ये प्रामुख्याने त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

मोठी बातमी - करणार होता प्लास्टिक सर्जरी; आता तुरुगांत होतेय चौकशी! 
 

Image may contain: 1 person, text that says "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपापली राजकीय विचारसरणी जोपासा, पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो जातो त्या नेतृत्वावर अल्पमाहिती, त्यावर शिंतोडे उडवू नका... शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते.... आजही जाणता राजा आहेत. आणि भविष्यात ही जाणता राजा राहणारच..... नितिन हिंदुराव देशमुख (कार्याध्यक्ष युवक मुंबई)"

 

मोठी बातमी - मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान

यालाच उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील घाटकोपरमध्ये पोस्टरबाजी केलीये. काल उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली होती. 'जाणता राजा' या शब्दांच्या वापरावर त्यांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. अशातच आज याच टीकेला राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येतंय. 'जाणता राजा'च्या विशेषणावरून मुंबईतील घाटकोपरमध्ये ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजपवासी उदयनराजे यांच्या टीकेला मुंबईत पोस्टरच्या माध्यमातून आता उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नितीन हिंदुराव देशमुख यांनी हे फ्लेक्स लावलेत. 

काय लिहिलंय पोस्टर्सवर  : 

"आपली राजकीय विचारसरणी नक्की जोपासा, पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो. त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून त्यावर शिंतोडे उडवू नका. शरद पवार आमचे काही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यात राहणारच.. " अशा आशयाचे बॅनर्स मुंबईत लागलेले पाहायला मिळतायत.  

मोठी बातमी - कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यमंत्र्यांची भेट?

उदयनराजे भोसले हे या आधी राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांना पोस्टर्सच्या माध्यमातून थेट उत्तर दिलं जातंय. 

NCP puts posters on the street of mumbai saying sharad pawar was is and will be our janata raja


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP puts posters on the street of mumbai saying sharad pawar was is and will be our janata raja