
आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबादेवी : शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावर एसटी कामगारांनी चप्पल फेक आंदोलन केल्याने मुंबईत वातावरण तणावपूर्ण झाले.107 आंदोलकांवर 353 आणि अन्य कलमाखाली त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपायुक्त हरि बालाजी एन, सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले,पोलिस निरीक्षक पूनम जाधव, प्रवीण पावले,माने यांच्या नेतृत्वात पोलिसांचा बंदोबस्त आहे.
तर आझाद मैदानावरीला जवळपास 250 ते 300 उपस्थित आंदोलक शांत झाल्याचे दिसून येत होते.तर काहीजण आपले रेल्वेचे रिझर्वेशन असल्याचे सांगत आझाद मैदानावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होते. रात्री 8:45 वाजता पोलिस अधिकारी काही आंदोलकांशी बोलताना दिसत होते.
Web Title: Ncp Sharad Pawar St Workers Throw Slippers Silver Oak Police At Azad Maidan Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..