गुजरातेत राष्ट्रवादीने काँग्रेस सोबतच आघाडी करावी 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सोमवारपासून कर्जत येथे राष्ट्रवादीचे दोन दिवसांचे राज्यस्तरीय चिंतन शिबीर होत आहे. या शिबिरात करण्यात येणाऱ्या ठरावांबाबत शरद पवार यांनी आज या नेत्यांसोबत चर्चा केली.

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसली तरी कॉंग्रेस सोबतच आघाडी करण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर मांडली. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सोमवारपासून कर्जत येथे राष्ट्रवादीचे दोन दिवसांचे राज्यस्तरीय चिंतन शिबीर होत आहे. या शिबिरात करण्यात येणाऱ्या ठरावांबाबत शरद पवार यांनी आज या नेत्यांसोबत चर्चा केली. नोटबंदी, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, आर्थिक, नागरीकरण व राजकिय विषया बाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे ठराव करण्यात येणार आहेत.

पक्षाची पुढील राजकिय वाटचाल व आघाडीच्या भूमिकेबाबत बोलताना गुजरात निवडणूकांत कॉंग्रेस सोबतच आघाडी करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पसंती दिली. मात्र पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना गुजरात निवडणूकी बाबतचे सर्वाधिकार दिलेले असून त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गुजरातमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादीमध्ये आघाडी संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. 

Web Title: NCP supports congress in Gujrat