शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक सुरू

NCPs important meeting in the presence of Sharad Pawar Started
NCPs important meeting in the presence of Sharad Pawar Started

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या  कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे 9 तास चालणाऱया या बैठकीत आज एकूण 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

आज मुंबईच्या बेलार्ड ईस्टेट परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षाची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत, ही बैठक सुमारे 9 तासापर्यंत सुरू राहणार आहे.या बैठकीत एकूण 18 लोकसभा मतदार संघ निहाय मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघांतल्या ताकदीचा अंदाज या बैठकीत घेतला.

आज आणि उद्या असे दोन दिवस चालणाऱ्या या आढावा बैठकीत एकूण 24 जिल्ह्यांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे आदी वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com