पालघर जिल्हयात आधुनिक रूग्णालयाची गरज

प्रमोद पाटील
शनिवार, 5 मे 2018

पालघर - जिल्हयात आधुनिक पद्धतीचे योग्य रूग्णालय नसल्याने गेल्या बुधवारी (ता.2) सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांचा कार अपघातात मृत्यू झाला. जर सुसज्ज रूग्णालय जवळ पास असते तर तत्काळ योग्य उपचार होऊन पाटील यांचा जीव वाचवता आला असता असे येथील लोकांचे म्हणणे आहे. 

1ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्हयाची निर्मिती झाल्या नंतर जिल्हयातील गोर-गरीबांना योग्य न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा होती. मात्र आजही सुसज्ज रूग्णालय, कुपोषण, रस्ते, पाणी, शिक्षण असे अनेक प्रश्न सध्या येथे आहे. हे प्रश्न आजही सामान्य माणसाला सतावत आहेत. नव निर्मिती जिल्हयाचे लोकांचे स्वप्न भंग पावले आहे. 

मुंबईच्या हाकेवर असलेल्या या जिल्हयाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आजही पालघर मुख्यालयात सुसज्ज यंत्रणा असलेले रूग्णालय नसल्याने तातडीचे उपचार करण्यासाठी प्रश्न निर्माण होतो. एखाद्या रूग्णाला तातडीचे उपचार करण्यासाठी मुंबईत अथवा गुजरातमध्ये वापी येथे घेऊन जावे लागते. मुंबई अथवा वापी येथे रूग्णांना पोहचे पर्यंत दीड ते दोन तास वेळ निघून जातो. त्यामुळे बरयाच वेळा रूग्णांना उपचार सुरू होण्यापुर्वीच मृत्यू होतो. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी अयशस्वी झाले आहेत.   

एकीकडे कुपोषणाने जाणारे बळी तर पैसे नसल्याने उपचार न घेता येत असल्याने नागरीकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. राज्यसरकार गुजरातच्या फायद्या साठी बुलेट ट्रेन साठी कोट्यवधी रूपये देते अन उपचारा विना जिव गमविणाऱ्या जनतेकडे दूर्लक्ष करत आहे. अशी येथील लोकांची भावना आहे. राज्यसरकार अपघातग्रस्तांचे बळी घेणे कधी थांबवेल आणि अत्याधुनिक रुग्णालय उभारणीसाठी जिल्हयातील आमदार लक्ष देतील का ?असा सवाल नागरिक विचारत आहेत. 

Web Title: Need of modern hospital in Palghar district