'नीट' परीक्षेसाठी नवा ड्रेसकोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट) नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 6 मे रोजी "नीट' परीक्षा होणार असून, नव्या ड्रेसकोडबाबत सक्ती करण्यात आली आहे.

पेपरफुटीच्या पार्श्‍वभूमीवर नवी नियमावली जाहीर केल्याचे "नीट'च्या वतीने सांगण्यात आले. परीक्षेसाठी जाहीर झालेल्या नव्या ड्रेसकोडबाबत सध्या चर्चा सुरू आहे. परीक्षेला येताना हाफ स्लिव्हचे फिकट रंगाचे कपडे अनिवार्य करण्यात आले आहेत. कपड्यांवर कोणतेही बटण नसावे, मुलींनी एम्ब्रॉयडरीचे कपडे परिधान करू नयेत, अशीही सक्ती करण्यात आली आहे. बुरखा घालणाऱ्या विद्यार्थिनी किंवा पगडी घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर पोचणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच बुटांऐवजी साध्या चपला किंवा कमी उंचीच्या सॅण्डल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्‍ट्रॉनिक उपकरण आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर दागिने, पाण्याची बाटली, मोबाईल, पाकिटे, घड्याळ आणि हॅण्डबॅग आणण्यास मज्जाव आहे. 13 लाखांहून अधिक विद्यार्थी "नीट' परीक्षा देणार आहेत.

Web Title: neet exam new dress code