नीता केळकर मराविमं सूत्रधारी कंपनीच्या संचालक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई : भाजपच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळ(मराविमं) या सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.

नीता केळकर मुळच्या सांगलीच्या रहिवासी असून सिव्हील इंजिनियर आहेत. तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमात सुध्दा त्यांचा सहभाग असतो. केळकर यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून केलेल्या नियुक्तीने मराविमं सूत्रधारी कंपनीत असलेली स्वतंत्र संचालकाची रिक्त जागा पुर्ण झाली आहे. 

संचालकांच्या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया, सुनील पिंपळखुटे संचालक (वित्त), विश्वास पाठक, प्रकाश पागे व राजेंद्र गोयंका उपस्थित होते

Web Title: Neeta Kelkar Director of the Company MRVM