मोबाईल चोरीप्रकरणी दांपत्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नेरळ - कर्जत रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाचा खिसा कापून मोबाईल चोरल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने कल्याणच्या दांपत्याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

नेरळ - कर्जत रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाचा खिसा कापून मोबाईल चोरल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने कल्याणच्या दांपत्याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

कर्जत स्थानकात 1 ऑक्‍टोबरच्या रात्री रेल्वे सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी सुनील जगदीश सिंह यांचा खिसा कापून मोबाईल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी केली. रेल्वे सुरक्षा स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका स्त्री व पुरुषाने हा मोबाईल चोरल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानकातील राम सुरेश बांदेलकर (30) आणि ज्योती राम बांदेलकर (22) या कल्याण येथे राहणाऱ्या संशयितांची चौकशी करून सामानाची तपासणी केली. त्यांच्याकडे सिंह यांचा मोबाईल सापडला.

Web Title: neral mumbai news crime