अतिवृष्टीतही माथेरानचा आपत्ती कक्ष बंदच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुख्याधिकारी गैरहजर; सुरक्षा रामभरोसे
नेरळ - अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 29) राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा लोकांच्या मदतीला सज्ज करण्यात आल्या होत्या; मात्र थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष मात्र बंद होता आणि आजही बंदच आहे.

सरकारच्या आदेशानुसार जूनमध्ये प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येतात. कर्जत तालुक्‍यात असे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी कर्मचारी दिसतात; मात्र अनेक अधिकारी तालुक्‍याच्या बाहेर राहताना दिसत आहेत. माथेरानमध्ये दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारने सावधानतेचा इशारा दिला होता, तरी आपत्ती व्यवस्थापन कक्ष बंदच होता.

माथेरानमध्ये बुधवारी (ता. 30) 138 मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त पावसाची नोंद माथेरानमध्ये आतापर्यंत 4302.90 मिलिमीटर झाली आहे. माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर घोलप हे माथेरानमध्ये राहत नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली. संततधार पावसात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरसेवकांनी गावात फिरून नागरिकांना धीर दिला.

Web Title: neral news matheran emergency ward close