माथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नेरळ - पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असलेल्या माथेरान-अमन लॉज या शटल सेवेच्या चार फेऱ्या रद्द करून मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान ही एकच फेरी सुरू करण्याचा रेल्वेचा बेत सपशेल फसला आहे. गाडीचा खर्च सोडाच, मोटरमन-गार्ड आदी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्चसुद्धा निघणार नाही अशी या सेवेची अवस्था झाली आहे.

सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी निघणारी नेरळ-माथेरान प्रवासी गाडी नेण्यासाठी एक मोटरमन, एक सहायक मोटरमन, एक गार्ड, एक तिकीट तपासनीस, सहा ब्रेक पोर्टर असे कर्मचारी काम करतात. त्याचवेळी गाडीसाठीचा डिझेलचा खर्च लक्षात घेता नेरळ-माथेरान फेरी व्यावहारिक नसल्याचे दिसत आहे. या गाडीसाठी प्रथम श्रेणीला 300 रुपये आणि दुसऱ्या श्रेणीला 75 रुपये तिकीट आकारले जात आहे.

नफ्यात चाललेल्या शटल सेवेला कमी वेळ मिळत असल्याने प्रवाशांच्या संख्येवर विपरित परिणाम झाला आहे.
 
Web Title: neral news mumbai news matheran mini train tourist