माथेरानच्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांपुढे वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नेरळ - थेट लोकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी, माथेरानसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात सरकारने नियुक्‍त केलेल्या नियंत्रण समिती, हेरिटेज समित्यासारख्या समित्यांमध्ये बसण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नसेल तर विशेष अधिकारांचा काय फायदा, असा प्रश्‍न माथेरानच्या नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष उपस्थित केला.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासंघाची बैठक नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झाली. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाची भूमिका समजावून घेतली. माथेरानमधील सर्व प्रलंबित विषयांत आपण स्वतः लक्ष घालू, असे आश्वासनही त्यांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना दिले.

Web Title: neral news Read Matheran's questions before the Chief Minister