नेरळ ग्रामसेवकाला लाचप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या घराशेजारी बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीने एका महिलेला परवानगी दिली होती. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. 

अलिबाग : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील एका बांधकामाची परवानगी रद्द करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेरळ येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली आहे. राजेंद्र गुदडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. 

कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या घराशेजारी बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीने एका महिलेला परवानगी दिली होती. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. 

ही परवानगी रद्द करण्यासाठी गुदडे यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत मिरकुटे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेरळ येथे सापळा लावला. त्यामध्ये गुदडे सापडले. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळमध्ये गुदडे हे तीन वर्षांपूर्वी ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neral Village garmshevak Arrested for bribery