नेरळला मुबलक पाणी मिळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई : गेल्या काही वर्षांत नेरळमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नेरळ वाढीव नळपाणी योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून तत्त्वतः मान्यता मान्यता दिली. 

नेरळ गावात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे सरकारने नवीन नळपाणी योजना मंजूर करावी, अशी मागणी घेऊन नेरळ शहर भाजपच्या वतीने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. ही भेट रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यावेळी चव्हाण यांनी नेरळ वाढीव नळपाणी योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे पत्र पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल; परंतु नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वत: मान्यता देत असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. त्याआधी नेरळ भाजपच्या शिष्टमंडळाने भाजप रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन नळपाणी योजना सरकारने मंजूर करावी, यासाठी मागणी करणारे निवेदन सादर केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neral will get abundant water