esakal | नवी मुंबईकरांसाठी खुशखबर; नेरूळ जेटीचे काम अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर; नेरूळ जेटीचे काम अंतिम टप्प्यात

खासदार राजन विचारे यांनी नुकतीच नेरूळ येथील जेटीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या वेळी येथील जेटीचे काम 75 टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अंतिम टप्प्यातील काम जलदगतीने मार्गी लावावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर; नेरूळ जेटीचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : खासदार राजन विचारे यांनी नुकतीच नेरूळ येथील जेटीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या वेळी येथील जेटीचे काम 75 टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अंतिम टप्प्यातील काम जलदगतीने मार्गी लावावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या जेटीवरून प्रवासी बोटीबरोबरच रो-रो सेवाही सुरू करावी. यासाठी लवकरच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असेही विचारे यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? आवक वाढल्याने कोथिंबीरीच्या भावात वाढ

पूर्व किनारपट्टीवरील भाऊचा धक्का, नेरूळ व मांडवा येथील जेट्टी उभारण्यात येत आहे. भाऊच्या धक्‍क्‍याची जेट्टी मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत, नेरूळ येथील जेट्टी सिडकोमार्फत व मांडवाची जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत विकसित करण्यात येत आहे. खासदार राजन विचारे यांनी नेरूळ येथे सिडकोमार्फत सुरू असलेले जेट्टीचे काम संथगतीने सुरू असल्याने दिनांक 19 जुलै 2019 रोजी येथील कामाची सिडको अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली होती. त्या वेळी हे काम 50 टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते. या कामाची वारंवार चौकशी करून त्यातील अडथळे दूर करून, या कामाला गती देण्याचे काम खासदार राजन विचारे यांनी केले. तर मागील आठवड्यात खासदार राजन विचारे यांनी नेरूळ येथील जेट्टीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या वेळी येथील जेट्टीचे काम 75 टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पाहणी दौऱ्याला सिडकोचे मुख्य अभियंता के. एम. गोडबोले, अधीक्षक अभियंता रमेश गिरी, कार्यकारी अभियंता महाले, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? जिओ ग्राहकांनो, थायलंडला जाण्यासाठी बॅगा भरा!
 
जेट्टीची थोडक्‍यात माहिती 
या जेट्टीच्या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत 111 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. नेरूळ ते भाऊचा धक्का हा प्रवास फक्त 30 मिनिटांचा असणार आहे व त्यापुढे मांडवा व अलिबाग यांना जोडणारा प्रवास 30 मिनिटांचा असणार आहे. असा एकूण नेरूळ ते अलिबाग 1 तासाचा प्रवास असणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या ठिकाणी प्रवासी बोटीतून प्रवासी वाढल्यानंतर दिवसाला 40 हजार प्रवासी ये-जा करू शकणार आहेत. 

loading image