नेरूळचा पाणीपुरवठा सुरळीत? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बेलापूर - नेरूळ विभागातील सेक्‍टर- ९ येथील जलउदंचन केंद्रातील पंप २५ वर्षांपूर्वीचे जुने असल्याने आणि कमी उंचीवर असल्याने पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन ते पंप बंद पडतात. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होते; परंतु आता सिडकोने बांधलेल्या या पंपहाऊसची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नेरूळचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. सेक्‍टर- ९ मधील जलकुंभ सिडकोने बांधला आहे. त्यातून अनेक सेक्‍टरना पाणीपुरवठा केला जातो. परंतु आता पंपरूम आणि ऑपरेटर रूमची दुरवस्था झाली आहे.

बेलापूर - नेरूळ विभागातील सेक्‍टर- ९ येथील जलउदंचन केंद्रातील पंप २५ वर्षांपूर्वीचे जुने असल्याने आणि कमी उंचीवर असल्याने पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन ते पंप बंद पडतात. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होते; परंतु आता सिडकोने बांधलेल्या या पंपहाऊसची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नेरूळचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. सेक्‍टर- ९ मधील जलकुंभ सिडकोने बांधला आहे. त्यातून अनेक सेक्‍टरना पाणीपुरवठा केला जातो. परंतु आता पंपरूम आणि ऑपरेटर रूमची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी पंपरूममध्ये शिरून शॉर्टसर्किट होते.

Web Title: Nerul sector 9 water supply

टॅग्स