वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी नेदरलँडच्या पाहुण्यांची उल्हासनगरात भेट

mumbai.jpg
mumbai.jpg

उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-अंबरनाथ या चार शहरांना मिळून उभारला जाणार आहे.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन डेव्हलपमेंटने स्वच्छ अभियान अंतर्गत नेदरलँडच्या अमस्टरडॅम सिटी सोबत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा करार केला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे नाव असून त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर पिटर सिमोन्स आहेत. 1 जानेवारीला पिटर सिमोन्स यांनी एकट्याने शहराचा दौरा केला होता. आज त्यांनी स्टेफ फेवरे, टीम रुईजस, लेक्स लेलीजव्हेल्ड, ऍलेस्टेअर बेएम्स यांच्या सोबत पाहणी केली. यामध्ये उल्हासनगरातील 360 टन कचऱ्यापैकी ओला सुखा याचे वर्गीकरण कसे केले जाते, हॉटेल्समधील टाकाऊ खाद्य पदार्थांची विल्हेवाट कशी लावली जाते, याची विचारणा करून दोन्ही डंपिंग ग्राऊंडची पाहणी केली.

यावेळी महापौर पंचम कलानी, उपमहापौर जीवन इदनानी, आयुक्त अच्युत हांगे, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारिया, किशोर वनवारी, नियोजन समिती सभापती मीना सोंडे, पाणी पुरवठा अभियंता चंद्रगुप्त सोनवणे, स्वच्छता निरिक्षक विनोद केणे, एकनाथ पवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com