मुंबईत आज कोरोनाचे तब्बल 'इतके' रुग्ण; जाणून घ्या आजची  कोरोना आकडेवारी.

corona
corona

मुंबई : मुंबईत आज 1263 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 92,720 झाली आहे. तर आज 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,285 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1441 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ३ दिवस अनावश्यक घराबाहेर पडू नका; 'हे' आहे कारण..   
                                                     
मुंबईत आज नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी  32 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  चौघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 32 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                         

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 949 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 64,616संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1441 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  64,872 रुग्णांना घरी सोडण्यात आले.   

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 70 टक्के इतका आहे. तर 11 जुलै पर्यंत एकूूूण 3,91,222 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 5 जुलै ते 11 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.39 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 50 दिवसांवर गेला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

new 1263 corona patients in mumbai today 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com