आज मुंबईत कोरोनाचे 'इतके' नवे रुग्ण; जाणून घ्या आजची आकडेवारी..

corona
corona

मुंबई : मुंबईमध्ये आज कोरोनाचे 1,395 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 135 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 2190 वर पोहचला आहे. शिवाय, कोरोनातून बरे होण्याचा दर 46 टक्के एवढा आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, रविवारी मुंबईमध्ये 79 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 59 जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये 55 पुरुष तर 24 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 4 जणांचे वय 40 वर्षांखाली आहे. 42 जण हे 60 वर्षांवरील, तर 33 जण हे 40 ते 60 वर्षादरम्यान होते. सध्या मुंबईत 28 हजार 959 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर, 41 हजार 534 संशयित रूग्णांची नोंद केली आहे. 

मुंबईत कोरोनाचे 758 संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या 41 हजार 534 वर पोहचली आहे. तसेच, 1039 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल 26 हजार 986 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 46 टक्के:

 मुंबईतील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 46 टक्के झाले आहे. 13 जुनपर्यंत 2 लाख 57 हजार 274 कोविड एकूण चाचण्या झाल्या आहेत. तर, 13 जुन या दिवशी एकूण 4 हजार 540 चाचण्या केल्या गेल्या. तर, 7 जुन ते 13 जुनपर्यंत कोविड वाढीचा दर 3 टक्के आहे.

new 1395 covid cases in mumbai today 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com