ठाणे जिल्ह्यात धोका कायम; दिवसभरात 195 बाधितांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

ठाणे महापालिका क्षेत्रासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ जिल्ह्याची चिंता वाढवणारी ठरत आहे.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ जिल्ह्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यात गुरुवारी एका दिवसात जिल्ह्यात 195 नव्या रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दोन हजार 903 वर तर, मृतांचा आकडा 87  वर गेला आहे. 

मोठी बातमी ः नवी मुंबईची लवकरच रेडझोनमधून सुटका? बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

गुरुवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 70 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात तर पाच रुग्णांचा (एकूण मृत्यू 42) मृत्यू झाला. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील बाधितांचा आकडा 913 वर पोहोचला. तर, कल्याण-डोंबिवलीत सहा रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 391 इतका झाला तर, मृतांचा आकडा आठ इतका झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 64 नवीन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तेथील बाधितांची संख्या 974 इतकी झाली. उल्हासनगरमध्ये 11 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 79 झाला तर, मृतांचा आकडा चारवर गेला आहे.

मोठी बातमी ः नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

मीरा भाईंदरमध्ये 21 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 286 इतका झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 33 झाला आहे. बदलापूरमध्ये सात रुग्णांसह बाधितांचा आकडा 75 झाला आहे. तसेच अंबरनाथमध्ये सहा नवी रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 23 वर गेला. तर, ठाणे ग्रामीण भागात नऊ बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 129 वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दोन हजार 903 वर गेला असून मृतांचा आकडा 87 झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 195 patients found corona positive in thane district