कल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी 

रविंद्र खरात 
सोमवार, 23 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942 रुपयांच्या  खर्चास मंजुरी दिली असून ऑगस्ट महिन्यात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

कल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942 रुपयांच्या  खर्चास मंजुरी दिली असून ऑगस्ट महिन्यात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत कल्याण सहित डोंबिवली ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड ग्रामीण आदी शहराचा समावेश होतो. कल्याण पश्चिम मधील बिर्ला स्कूलच्या बाजूला कल्याण आरटीओ कार्यलय आहे मात्र ती जागा तोकडी पडत असून अधिकारी कर्मचारी अपुऱ्या जागेत आपले काम करत आहेत यावर तोडगा म्हणून आरटीओचे नवीन कार्यालय व्हावे याची मागणी वाढत होती . 

राज्याच्या परिवहन मंत्री पदाचा पदभार दिवाकर रावते यांनी स्वीकारताच त्यांनी कल्याण मध्ये येऊन पाहणी ही केली होती आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ही दिले होते . दरम्यान कल्याण पश्चिम वाडेघर या ठिकाणी 8 हजार 220 चौ. मी. जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून दोन महिन्यांपूर्वी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सचिव समितीने अंदाजपत्रकास आणि नकाशांना सहमती दर्शवली होती. एकूण 10 कोटी 46 लाख 25 हजार 942 रुपयांचे अंदाजपत्रक असून त्याला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळणे बाकी होते.

मात्र या अंदाजपत्रकाला सरकारने मागील आठवड्यात मंगळवारी मान्यता दिली असून येत्या काही दिवसांत इमारतीच्या बांधकामास सुरुवात होईल. परंतु काम सुरू करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशाला वास्तूविशारदाकडून मंजुरी घेऊनच सुरू करावे, ही अट ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष काम करताना मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सरकारने खर्चास मान्यता दिली आहे. 

सरकारी काम जरा थांब अशी अवस्था अनेक प्रकल्पाची झाली आहे , राज्य सरकार अनेक घोषणा करते मात्र त्या कागदावर राहिल्याचे अनेक उदाहरणे आहेत . आता आरटीओ कार्यालय मध्ये अनेक त्रुटी आहेत त्या नवीन इमारती मध्ये नागरिकांना मिळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आरटीओ मधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा मोठा मनस्ताप दूर होणार आहे मात्र निधी लवकर मिळून कामाला लवकर सुरू व्हावे या मागणीला जोर धरू लागला आहे.

याबाबत कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाने यांनी या  निधी बाबत वृत्ताला दुजोरा दिला तर निधी जुलै महिन्यात मिळताच ऑगस्ट महिन्यात कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: New building fund sanctioned for Kalyan RTO