नव्या केबल दरांची अंमलबजावणी लांबणीवर?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या नव्या केबल दरांची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात बदलाचा आराखडा (मायग्रेशन प्लॅन) तयार करत असल्याची माहिती "ट्राय'चे सचिव एस. के. गुप्ता यांनी गुरुवारी (ता.27) पत्रकाद्वारे दिली.

'ट्राय'च्या नव्या दरांना केबलचालकांनी तीव्र विरोध केला असून, गुरुवारी तीन तास वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद ठेवले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन "ट्राय'ने अंमलबजावणीसाठी काही अवधी देण्याची भूमिका घेतली आहे. नवी दरप्रणाली न स्वीकारणाऱ्या ग्राहकांचे टीव्ही संच 29 डिसेंबरपासून बंद होतील, असे संदेश समाजमाध्यमांवर फिरत होते. कोणाचेही टीव्ही संच 29 डिसेंबरपासून बंद होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे "ट्राय'ने वाहिन्या आणि सेवा पुरवठादारांना कळवले आहे.

ग्राहकांचे हित ध्यानात घेऊन हा बदल सुरळीत व्हावा म्हणून "मायग्रेशन प्लॅन' आखत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला पूर्ण माहिती घेऊन निवड करता येईल आणि सेवा पुरवठादारही आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करू शकतील, असेही पत्रकात म्हटले आहे. ही मुदत किती असेल, हे अद्याप निश्‍चित नाही. याबाबत एक-दोन दिवसांत स्पष्टीकरण येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, त्यासाठी काही आठवडे अथवा एक महिना लागू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: New Cable Rate S. K. Gupta