शिवसेनेच्या निधी वाटपात नव्या नगरसेवकांची बोळवण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - महापालिकेच्या स्थायी समितीने अर्थसंकल्पात केलेल्या फेरफारातून सत्ताधारी शिवसेनेने 72 कोटींचा निधी मिळवला. मात्र, या निधीचे वाटप करताना नव्या नगरसेवकांना ज्येष्ठांनी ठेंगा दाखवला आहे. स्थायी समिती सदस्यांनी 70 लाखांचा निधी घेऊन नव्या नगरसेवकांची 25 ते 35 लाखांवर बोळवण केली आहे. महापौरांनाही फक्त 50 लाखांचा निधी मिळाला आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करताना 72 कोटींचा निधी शिवसेनेने स्वत:च्या नगरसेवकांसाठी ठेवला. ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यातील जास्त निधी घेतला. नव्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात जम बसवण्यासाठी गरज असताना त्यांना 25 ते 35 लाखांचा निधी देण्यात आला. स्थायी समितीच्या सदस्यांना 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर यांना 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. एवढाच निधी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना मिळाला आहे. विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या माजी महापौरांना 45 लाखांचा निधी देण्यात आला आहे. 

स्थायी समितीमार्फत मिळणाऱ्या अतिरिक्त निधीतून नगरसेवक त्यांच्या प्रभागातील वाढीव कामे करून प्रभागात जम बसवतात. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. मतदारांची कामे केली तरच त्याचा प्रभाव मतदानावर पडू शकतो. निधी वाटपात कमी वाटा मिळाल्याने नवे नगरसेवक नाराज झाले आहेत. या 25 लाखांत एक शौचालय तरी बांधून होईल का, अशा शब्दांत ते नाराजी व्यक्त करत आहेत. 

Web Title: New corporators in Shiv Sena funding