मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी उभारण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत 19 एप्रिलला आदेश जारी होण्याची शक्‍यता आहे. पाच सायबर पोलिस ठाणी असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. वांद्रे येथे एकाच इमारतीत प्रत्येक परिमंडळासाठी एक अशी पाच सायबर पोलिस ठाणी असतील. त्यामुळे सायगर गुन्ह्यांचा वेगाने तपास करण्यास मदत होणार आहे.

शहरात वाढीव सायबर कक्ष स्थापन करण्याबाबत विचार सुरू होता; मात्र या कक्षांना स्वतः तक्रार दाखल करून घेण्याबाबत मर्यादा येते. त्यामुळे आणखी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एक सायबर पोलिस ठाणे आहे; मात्र सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने आणखी चार पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत.

Web Title: new cyber police station in mumbai