महाराष्ट्रातल्या नव्या सरकाचा 'इथे' होणार शपथविधी?

महाराष्ट्रातल्या नव्या सरकाचा 'इथे' होणार शपथविधी?

महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागलेत. अशातच सर्वच प्रमुख पक्ष सत्तास्थापनेसाठी तयारीला लागलेत. यात, आता शपथविधीची जागा ठरल्याची माहिती समोर येतेय. दिवाळी नंतर महाराष्ट्रातील नवीन सरकार सत्ता स्थापन करणार आहे.   

31 ऑक्टोबरला महायुती सरकारच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवर शपथविधी सोहळा पार पडणार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मागच्या खेपेला वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा शपतविधी सोहळा पार पडला होता. अशातच आता वानखेडे ऐवजी महालक्ष्मी रेस कोर्सवर शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

दरम्यान सगळे एक्झिट पोल फोल ठरवत राज्यातल्या जनतेनं धक्कादायक निकाल दिलाय. या निकालांनी भाजपच्या अपेक्षांवर पुरतं पाणी फेरलंय. त्यामुळे आता नवं राजकीय समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं 


शिवसेनेबाबत कॉंग्रेस काय बोलतेय ?

अब की बार, 220 पार', अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे तयार झाली असून आमच्याकडे कुठला प्रस्ताव आल्यास आम्ही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून विचार करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे, आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. पण शिवसेनेला भाजपच्या दबावाखालून बाहेर पडावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट करतानाच जर शिवसेनेकडून कसल्याही प्रकारचा प्रस्ताव आला तर आम्ही दिल्लीला विचारून पुढे विचार करू असे त्यांनी सांगितले.

Webtitle : new government will conduct their oath taking ceremony in mahalaxmi racecourse  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com