ठाण्यात पोलिस कुटुंबांना तीन वर्षांत नवीन घरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

ठाणे - वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीमध्ये गेली पाच ते सहा वर्षे धोकादायक स्थितीत राहणाऱ्या 556 पोलिसांच्या कुटुंबांना तीन वर्षांत नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. या कामाला वेग मिळून म्हाडाच्या वतीने पोलिस वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव ठाणे पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार 556 सदनिका विनामोबदला बांधून देणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. 

ठाणे - वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीमध्ये गेली पाच ते सहा वर्षे धोकादायक स्थितीत राहणाऱ्या 556 पोलिसांच्या कुटुंबांना तीन वर्षांत नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. या कामाला वेग मिळून म्हाडाच्या वतीने पोलिस वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव ठाणे पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार 556 सदनिका विनामोबदला बांधून देणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुनर्विकासातून उपलब्ध होणाऱ्या एक हजार अतिरिक्त सदनिकांमध्ये पोलिसांच्या कुटुंबांना प्राधान्य देणार असल्याचे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्लॅब कोसळणे, पावसात पाणी घरात येणे आदी कारणांमुळे पोलिसांच्या कुटुंबांना या ठिकाणी राहणे जिकरीचे झाले आहे. या इमारतींचे पुनर्वसन व्हावे, यासाठी पोलिसांच्या कुटुंबांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. म्हाडाच्या वतीने पोलिस कुटुंबांना सामावून घेणाऱ्या तीस मजली इमारती या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. पोलिसांनी हे काम केल्यास त्यांना बांधकाम खर्चाव्यतिरिक्त पोलिस विभागाकडील सेवा शुल्काची थकबाकी साधारणपणे पाच कोटी आणि त्यावरील व्याज, ठाणे महापालिकेकडे पायाभूत सुविधांकरिता भरावयाचे शुल्क 7.5 कोटी, बांधकाम क्षेत्रासाठी म्हाडाकडे भरावे लागणारे अधिमूल्य 75.89 कोटी असा सुमारे 100 कोटींहून अधिक खर्च तसेच बांधकाम खर्च करावा लागणार आहे; मात्र हा खर्च वाचविण्यासाठी दुसरा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार 556 सदनिका मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे म्हाडाने म्हटले आहे. 

म्हाडा एक हजार सदनिका उभारणार 
पोलिस कुटुंबांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात म्हाडा या जागेतील 40 हजार चौरस मीटर क्षेत्रावर जवळपास एक हजार सदनिका उभारणार आहे. या सदनिका म्हाडाच्या धोरणानुसार (पुनर्विकासाचा सर्व खर्च विचारात घेऊन) बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सदनिकांची विक्री करताना पोलिसांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे म्हाडाने प्रस्तावात नमूद केले आहे. सदनिकांबरोबरच पोलिस ठाणे, सहायक पोलिस आयुक्त कार्यालयसुद्धा म्हाडामार्फत मोफत बांधून देण्यात येणार आहे.

Web Title: New houses for Thane police families in three years

टॅग्स