कोणतेही औषध नसलेल्या आजारावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - "एससीए 12' हा दुर्मिळ आजार झालेल्या रुग्णावरील शस्त्रक्रिया मुंबईतील जसलोक रुग्णालयात झाली. या आजारावर कोणतेही औषध किंवा उपचार पद्धती नसल्याने अत्यंत वेगळ्या पद्धतीने झालेली जगातील ही पहिली शस्त्रक्रिया आहे, असा डॉक्‍टरांचा दावा आहे. शरीराला येणारा कंप बऱ्याचदा नेहमीचा वाटतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. केव्हा-केव्हा ते स्पायनोसेरेबेलर अटॅक्‍सिया टाईप 12 या दुर्मिळ आजाराचे लक्षण असू शकते, असा इशारा जसलोक रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिला आहे.

नवी मुंबईतील 57 वर्षांच्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 2003 पासून तिच्या हातांना आणि अनेकदा शरीराला कंप सुटत होता. नंतर तो वाढू लागला. चालताना झोकांड्या जाऊ लागल्या. दृष्टीमध्ये फरक जाणवू लागला. जसलोक रुग्णालयातील न्युरो सर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोशी आणि डॉ. पेट्रस वाडीया यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. औषध आणि इंजेक्‍शनने रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याचे डॉ. दोषी यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेची कोणतीही रूढ पद्धत नाही. या दोघांनी प्रयोगातून शोध लावलेल्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

तब्बल सहा तास लोकल ऍनेस्थेशिया देऊन जागृतावस्थेत शस्त्रक्रिया करण्यात आली. कवटीला दोन छेद करून त्यातून दोन इलेक्‍ट्रोड आत सोडण्यात आल्या. शरीरातील कंप नियंत्रित करणाऱ्या बिंदूंना उत्तेजित करण्यात आले. शरीराला येणारा कंप नियंत्रित करण्यासाठी माया यांच्या गळा आणि खांद्याच्या मध्यभागी पेसमेकर बसविण्यात आले आहे. ते रिमोट कंट्रोलने बाहेरून नियंत्रित करता येते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी माया यांच्या शरीरातील कंप नियंत्रित करण्यासाठी आणखी तीन महिने लागतील, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

अगरवाल समाजात 13 रुग्ण
भारतात अगरवाल समाजात "एससीए 12' हा दुर्मिळ आजार आढळतो. गुणसूत्रांतील बदलांमुळे हा आजार होतो. जसलोक रुग्णालयात 13 रुग्णांची नोंद आहे. गर्भधारणेनंतर जनुकीय चाचणी करणे किंवा आयव्हीएफ पद्धतीचा वापर करून फलित अंड्यांची जनुकीय चाचणी करून त्यापैकी निर्दोष अंड्याचे गर्भाशयात रोपण करणे असे मोजके पर्याय आहेत. भारतात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत, असे जसलोक रुग्णालयाचे डॉ. पेट्रस वाडिया यांनी सांगितले.

Web Title: New innovation in Surgery