रिक्षा परवान्यातील अडचण झाली दूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नवी मुंबई - रिक्षा परवाने वाटपावरील निर्बंध हटवल्याने परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत; मात्र अर्ज सादर करताना त्यांना रिक्षा बॅच, परवाना शुल्कासोबत पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे; परंतु हे प्रमाणपत्र लगेच मिळत नसल्यामुळे ते सहा महिन्यांत सादर करण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे अर्ज करताना येणारी ही अडचण दूर झाली आहे. अर्ज करताना हे प्रमाणपत्र सादर न केल्यास वाहन नोंदणी करेपर्यंत अर्जदार ते सादर करू शकतात, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

वाशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ५०० हून अधिक जणांनी परवान्यासाठी चौकशी केली; परंतु केवळ १०० जणांनी अर्ज केले आहेत. अनेकांना पोलिसांचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांनी अर्ज केलेले नाहीत; परंतु त्यांना आता यामुळे दिलासा मिळाला आहे. ते अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांत पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. यामुळे जास्त अर्ज येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: new mumbai autorickshaw