नवी मुंबई मेट्रोची डिसेंबरमध्ये चाचणी 

Metro
Metro

खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावर येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असून मेट्रोचे सहा डब्बे पुढील महिन्यात येणार असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना सांगितले.

बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम 2011मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या नऊ वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे. सदर काम कामात सेंजोसे, महावीर रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर आदि कंपन्या करीत होत्या. मात्र मध्यंतरी केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आलेल्या मंदीचा फटका आणि काही कंपन्यानी न्यायालयात धाव घेतल्या त्यामुळे मेट्रोचे काम एकप्रकारे थांबले होते.

न्यायालयाने कंपन्याची याचिका  फेटाळून लावल्यानंतर 2018 मध्ये मेट्रोच्या कामाला गती मिळाली. गेल्या वर्ष भरात, रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आदि कामे जोरात सुरु आहे. तर पावसामुळे स्थानकावरील अंतर्गत कामे केली जात आहे. मेट्रो मार्गावर धावणारी सहा डब्बे मार्च महिन्यात दाखल झाले आहे. पुढील सहा डब्बे ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. तसेच सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून खारघरगाव, पेठपाडा, अमनदूत स्थानकांचे काम अंतिम टप्यात आहे.

मेट्रोसाठी लागणाऱ्या स्वतंत्र सब स्टेशनची उभारणी करण्यात आले आहे. तळोजा पाचनंद येथे 22 तर खारघर मध्ये 33 केव्हीचे सब स्टेशन उभारण्यात आले आहे. सब स्टेशनमधील वीज जोडणीसाठी जवळपास अडीच कोटी रुपये अनामत रक्कम महावितरणकडे सिडकोने भरणा केला आहे. महिना अखेरपर्यंत दोन्ही सब स्टेशन मधील वीज वाहिन्या सुरु होणार आहे.  

सब स्टेशनचे काम अंतिम टप्यात आहे. तर नवी मुंबई मेट्रोचे रेल्वेची ट्रायल डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.
- दीपक हरताळकर, कार्यकारी अभियंता सिडको मेट्रो रेल्वे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com