नवी मुंबई दिल्लीपेक्षाही प्रदूषित!

नवी मुंबई दिल्लीपेक्षाही प्रदूषित!
नवी मुंबई दिल्लीपेक्षाही प्रदूषित!

नवी मुंबई : समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी (ता.१८) सकाळपासून धुकट वातावरण दिसून येत होते. शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षाही अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस या संस्थेच्या अहवालातून समोर आले. प्रदूषणात अचानक झालेल्या या वाढीमुळे नवी मुंबईकरांना सकाळच्या वातावरणात देखील श्वास घेताना त्रास सहन करावा लागत होता.

नवी मुंबईतील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस या केंद्र सरकारशी संलग्नित असलेल्या संस्थेने केलेले हवेतील मोजमापनाच्या सर्व्हेनुसार ही माहिती दिसून येत आहे. नवी मुंबईतील वायुप्रदूषणात अचानक वाढ झाली आहे. शुक्रवारी नवी मुंबईच्या वातावरणाने तर दिल्लीलादेखील मागे टाकले असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस या संस्थेच्या मोजमापावरून दिसून येत आहे. शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार अचानक पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण प्रदूषित झाले.

नवी मुंबईचा शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सफर इंडिया क्वॉलिटी सर्व्हिसच्या सर्व्हेनुसार नवी मुंबईची हवा गुणवत्ता पातळी ही ३०२ इतकी होती. तर त्या तुलनेत मात्र दिल्लीची २६२ इतकी होती. शनिवारी वातावरणात झालेल्या या बदलामुळे नवी मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. सकाळच्या वेळी थंड वातावरण व दुपारी गरम वातावरणामुळे ऑक्‍टोबर हिटमुळे मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना श्वास घेतानादेखील त्रास जाणवत होता. वातावरणात असलेल्या या बदलामुळे सर्दी, खोकला; तसेच अशक्तपणा वाटत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी होत्या. वातावरणामध्ये असा अचानक का बदल झाला? याची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. तर सागर किल्लेदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्यामुळे वातावरणात बिघाड होत आहे व याला मानवच कारणीभूत आहे. विकासांच्या नावाखाली बेसुमार झाडांची कत्तल करण्यात येत आहे. ते थांबवणे आवश्‍यक आहे. तसेच पर्यावरणासाठी झाडे लावणे आवश्‍यक असून, ती झाडे जगवणे महत्त्वाचे आहे. फटाके वाजवू नयेत. फटाक्‍यांच्या धुरामुळे प्रदूषण वाढत असून, खारपुटी जगवणे आवश्‍यक आहे. 
-दिव्या गायकवाड, सभापती, पर्यावरण समिती, नवी मुंबई महापालिका.

समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे व हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पावसाची शक्‍यता होती. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून, वातावरण प्रदूषित झाले आहे. या वातावरणामध्ये पडलेल्या पावसात भिजल्याने आजारी पडण्याची शक्‍यता आहे. तर या प्रदूषित वातावरणामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्‍यता आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार बळावू शकतात. त्यामुळे प्रदूषित वातावरणामुळे तोंडाला मास्क लावून फिरावे; तसेच शारीरिक कामकाज असेल तर ते टाळणे आवश्‍यक आहे.
-डॉ. शाम यादव, बीएचएमएस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com