नवी मुंबईत एड्‌स जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - जागतिक युवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये आणि विद्यालयांत एड्‌स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील एड्‌सग्रस्त बालक आणि रुग्णांसाठी विशेष कार्यक्रम ठेवले आहेत. दर वर्षीप्रमाणे या वेळीही वाशीतील पालिका रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. 

पालिका रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, सुरक्षा क्‍लिनिक आणि वाशी आर्ट सेंटर यांच्या वतीने एड्‌सबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशीतील आयसीएल कॉलेजमध्ये एक दिवसाची कार्यशाळा ठेवली होती. यावेळी मार्गदर्शन करून माहिती पत्रके वाटण्यात आली. एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकातर्फे युवक व एचआयव्हीग्रस्तांसाठी सेवा-सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम याची माहिती देण्यात आली. ताप, रक्तदान आदींवर यावेळी चर्चा झाली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सदानंद वाघचौरे, जयवंत पाटील, समुपदेशक माधुरी लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: new mumbai news aids