नवी मुंबई खाडीत खेकड्यांचा दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - खेकड्यांच्या प्रजननावर दुष्परिणाम झाल्याने नवी मुंबईच्या खाडीत खेकड्यांचा दुष्काळ पडला आहे. खेकडे सापडत नसल्याने निर्यात थंडावली आहे.  

नवी मुंबईच्या खाडीकिनारी खारफुटी आणि खाडीला लागून काळी जमीन असल्याने काळे खेकडे (मड क्रॅब) मोठ्या प्रमाणात सापडतात. नवी मुंबईबरोबरच मुंबईतील मोठमोठ्या हॉटेलमधूनही या खेकड्यांना मागणी आहे. चेन्नईतूनही मागणी आहे. हे खेकडे सिंगापूरला निर्यात करण्यात येतात. 

जून ते सप्टेंबर हा खेकड्यांचा मुख्य हंगाम आहे. या काळात भरलेले खेकडे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे याच काळात खेकड्यांची मोठी निर्यात करण्यात येते. आठवडाभरात दर दोन दिवसांनी ८०० ते १००० किलो खेकड्यांची निर्यात करण्यात येते; परंतु यंदा खाडीकिनारी खेकडे नसल्याने आठवड्यातून एकदाच खेकड्यांची निर्यात केली जात आहे. परिणामी, निर्यातदार धास्तावले आहेत.

यंदा दुष्काळ असल्याने आठवड्यातून एकदाच खेकड्यांची निर्यात करण्यात येते. खेकडे सापडण्याचे प्रमाण ७० टक्के कमी झाले आहे.
- सुभाष सुतार, खेकडा निर्यातदार 

खारफुटीची कत्तल, जलप्रदूषण यांमुळे खेकड्यांची प्रजनन स्थाने नष्ट होत आहेत. त्यांच्या पिल्लांची वाढ न झाल्यास त्याचे प्रमाण कमी होते. 
- विवेक वर्तक, खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल

Web Title: new mumbai news Crab