नवी मुंबईला पावसाने झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नवी मुंबई - अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर अचानक हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या लखलखाटासह कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः नवी मुंबईला झोडपले. सकाळी घराबाहेर पडताना ऊन असल्यामुळे छत्री व रेनकोट सोबत घेतले नसलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे बेलापूर येथील डोंगर व नेरूळ येथील पारसिक हिल धुक्‍यात हरवली होती. काही ठिकाणी डोंगरावरून धबधबे वाहण्यास सुरुवात झाली. 

7 जूनला सुरू झालेल्या पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारली होती. त्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक घामाघूम झाले होते; परंतु गुरुवारी दुपारपासूनच नवी मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण व गार हवा सुटली होती. वातावरणात आर्द्रता जाणवत असल्याने काही भागांत गरम वारे वाहत होते; मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. पावसासोबत सोसाट्याचा वारा असल्यामुळे शहरात चार ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यात वाशी सेक्‍टर 17 येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या कारचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. बेलापूर सेक्‍टर 20 येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तासभर चांगला पाऊस पडल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बेलापूर उड्डाणपुलाच्या सर्कलजवळ पाणी साठले होते. कोकण भवन ते कमिशन ऑफिसजवळील सिग्नलजवळ व नेरूळ सेक्‍टर 10 एलआयजी कॉलनीत पाणी साठल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आल्या होत्या. या ठिकाणी तत्काळ पथकाने धाव घेऊन साठलेले पाणी काढून रस्ता मोकळा केला. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाची नवी मुंबईत 46.82 मिमी इतकी नोंद झाली.

Web Title: new mumbai news rain