नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

नवी मुंबई - जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी नवी मुंबईत शनिवारी (ता. २९) दिवसभर सर्वत्र पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

नवी मुंबई - जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी नवी मुंबईत शनिवारी (ता. २९) दिवसभर सर्वत्र पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

महानगरपालिकेतर्फे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत बोर्डाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागात पाणीपुरवठा होणार नाही. ३ वाजेनंतर पालिका हद्दीतील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांसाठी आणि सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठादेखील बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी (ता. ३०) योग्य दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असे महानगरपालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: new mumbai news water