नवी मुंबईच्या सुरक्षेची ऐशीतैशी

New-Mumbai-Security
New-Mumbai-Security

२१ व्या शतकातील स्मार्ट सिटी, सायबर सिटी व प्लान सिटी अशा अनेक बिरुदावल्यांनी प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानके, त्यावरील वाणिज्य कार्यालये, बीपीओ, मॉल्स अशा महत्त्वांच्या ठिकाणी अद्यापही सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे उलटल्यानंतरही सुरक्षेबाबत सुरक्षायंत्रणा अद्याप सतर्क नसल्याचे रविवारी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. अगदी हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके, प्रवेशद्वार आणि मॉल्स येथील सुरक्षांचा आढावा घेतला.

स्थानिक यंत्रणांकडून पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेऐवजी इतर विशेष सुरक्षा सरकारी यंत्रणांकडून पुरवल्या जात नसल्याचे दिसून आले. सीबीडी-बेलापूर पासून अगदी वाशी रेल्वेस्थानकांपर्यंत सिडकोने प्रत्येक स्थानकांवर खासगी कंपन्यांसाठी विविध कार्यालये व व्यावसायिक गाळे तयार केले आहेत. या गाळ्यांमध्ये आणि कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या अनोळख्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी खासगी संस्थांतर्फेच विविध परवडणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत. मात्र रेल्वे पोलिसांकडून स्थानकाव्यतिरिक्त प्रवेशद्वार, फलाटे, महिला कक्ष आदी भागात चोख बंदोबस्त पुरवला जात नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी ओस पडलेल्या फलाटांबाबत पोलिसांना विचारले असता आता परत कुठे होणार आहे हल्ला, असे बोलून काही पोलिस कर्मचारी २६/११ सारख्या हल्ल्यातून अद्यापही काही शिकलेले नाहीत, असे जाणवते. नवी मुंबईतील वाशी शहर हे मॉल्सचे शहर म्हणून ओळखले जाते. सेंटर वन, रघुलीला मॉल, इनऑर्बिट मॉल, पामबीच गॅलेरिया अशा या मॉलच्या बाहेरची गर्दी पाहता येथेही खासगी सुरक्षेऐवजी सरकारी सुरक्षेची वानवा दिसून आली. पोलिस यंत्रणांकडून आपल्याकडे पुरेसा बंदोबस्त देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची कारणे दिली जात आहेत. त्यामुळे एकूणच दहशतवादी कारवायांमधून वरिष्ठ पातळीवरील यंत्रणांनीही अद्याप काहीही बोध घेतलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com