मुंबई कृषी बाजारात मुबलक भाजीपाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बाजारातील एकूण भाजीपाल्यात एकट्या महाराष्ट्रातून 90 टक्के भाजीपाला मुंबईत येत आहे. केवळ दहा टक्के भाजीपाला परराज्यांतून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना ताजा भाजीपाला आणि तोही स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळाला आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजारातील घाऊक भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 गाड्या भाजीपाला येतो. मुंबई आणि इतर उपनगरांना भाजीपाल्याचा पुरवठा करण्यासाठी इतका भाजीपाला लागतोच. परंतु हा माल फक्त महाराष्ट्रातून येत नाही; तर शेजारच्या कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून मुंबईत भाजीपाला येत असतो. त्यात राज्यातील भाजीपाल्याचे प्रमाण 60 टक्के असते. परंतु या वेळी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील भाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील भाजीपाल्याची आवक 90 टक्‍क्‍यांवर गेली आहे. 

घाऊक बाजारात नाशिक, सातारा, सांगली आणि पुण्यातून भाजीपाला नियमित येत आहे. त्यामुळे पूर्वीचे भाजीपाल्याच्या टक्‍क्‍यांचे गणित आता बदलले आहे. राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांवर गेले आहे. केवळ दहा टक्के भाजीपाला परराज्यांतून येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही स्थिर आहेत. 
- शंकर पिंगळे, माजी संचालक, भाजीपाला बाजार. 

Web Title: new mumbai vegetables