व्होट बॅंकेचे राजकारण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नवी मुंबई -: मतदार आम्हाला निवडून देतात. तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांवर तुम्ही कशी कारवाई करता, अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी बुधवारी (ता. 23) स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी रात्री धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात जातात. त्यामुळे परिसरात रात्री दहशतीचे वातावरण तयार होते. मग रात्रीच कारवाई का करता, असा प्रश्‍न शिवसेनेचे पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर यांनी विचारला. धार्मिक स्थळांवर कारवाई केली, तर ज्यांच्या मतांवर आम्ही निवडून येतो, त्यांना काय उत्तर द्यायचे.

नवी मुंबई -: मतदार आम्हाला निवडून देतात. तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांवर तुम्ही कशी कारवाई करता, अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी बुधवारी (ता. 23) स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी रात्री धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात जातात. त्यामुळे परिसरात रात्री दहशतीचे वातावरण तयार होते. मग रात्रीच कारवाई का करता, असा प्रश्‍न शिवसेनेचे पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर यांनी विचारला. धार्मिक स्थळांवर कारवाई केली, तर ज्यांच्या मतांवर आम्ही निवडून येतो, त्यांना काय उत्तर द्यायचे. धार्मिक स्थळे पाडण्यापेक्षा ती वाचवण्यावर अधिकारी का भर देत नाहीत, असा प्रश्‍न नामदेव भगत यांनी उपस्थित केला. 

जेएनएनयूआरएमच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स संगणकीय प्रणालीच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या विषयावरून चर्चेला सुरुवात झाली. या वेळी आलेल्या विविध विषयांवर लोकप्रतिनिधींनी मत मांडल्यानंतर स्थायी समिती संपल्यानंतर आयत्या वेळच्या विषयामध्ये महापालिकेच्या कारवाईवर बोट ठेवले. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक रात्रीच्या वेळेला अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईला जाते. त्या वेळी त्यांच्यासोबत मोठा पोलिस फौजफाटा असतो. त्यामुळे रात्री नागरिक आम्हाला भयभीत होऊन फोन करतात. मग आम्ही काय करायचे, असा प्रश्‍न द्वारकानाथ भोईर यांनी विचारला. तर आम्ही ज्या जनतेमधून निवडून येतो, त्यांचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळ तुटल्यानंतर ते आम्हाला जाब विचारणार. त्यामुळे धार्मिक स्थळे तोडण्यापेक्षा त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन का प्रयत्न करत नाही, असा प्रश्‍न नामदेव भगत यांनी उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की 2009 आधीच्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याआधी त्यांच्याकडून पुरावे मागितले आहेत. तशा जाहिरातीही वर्तमानपत्रांमध्ये दिल्या आहेत. परंतु, ज्यांचे न्यायनिवाडे पूर्ण होतात अशांवरच कारवाई करण्यात येत आहे. या वेळी धार्मिक स्थळे तोडण्यासाठी आतुर असलेले विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय चौगुले व शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी नांगरे पोलिसांवर दबाव टाकून, त्यांच्याकडून ऐन सणाच्या काळात पोलिस बंदोबस्त मागवून घेत आहेत. अशा अधिकाऱ्यांना काय पडले आहे, अशा शब्दांत चौगुले यांनी तोंडसुख घेतले. तर, कारवाई करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. 

Web Title: new mumbai vote bank