नव्या रंगात नव्या ढंगात पुन्हा येणार हजाराची नोट?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नव्या रंगात आणि नव्या रुपात आता एक हजाराची नोट परत येणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. एका इंग्रजी वूत्तापात्राच्या माहितीनुसार एक हजाराच्या नोटेच्या डिझाईनवर सध्या काम सुरु आहे असं सांगितलं गेलंय. 
 
जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा या नोटाबंदीमध्ये पूर्णतः बंद झाल्यात. त्यानंतर मोठ्या चलनाची नोट येणार नाही असं वाटत होतं. मात्र त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून RBI ने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केलीये असं देखील बोललं जातंय.  

सरकारने  नोटाबंदीनंतर नवीन दोनशे रुपयांचीही नोट बाजारात आणली. अशातच नव्या फीचर्सच्या दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटा या देखील आता चलनात आल्यात. काही नवीन नाणी देखील सरकारने आणली आहे. अशातच आता हजार रुपयांची नवीन नोट येणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. 
 
मध्यप्रदेशातील देवासमध्ये याआधी 500 आणि 1000 च्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात होत होती. अशात आता 1000 ची नवीन नोट चलनात येणार असेल तर त्याची छपाईचं मोठं टार्गेट देवासला मिळू शकतं असं देखील बोललं जातंय.  देशात फक्त देवासमध्येच नोटांवर वापरली जाणारी शाई बनवली जाते.  म्हैसूर आणि सालबोनीमधल्या छपाई कारखान्यात देखील नव्या एक हजाराच्या नोटेची छपाई होऊ शकते. 
 
WebTitle : new one thousand note will come in market says sources

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new one thousand note will come in market says sources

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: