दहा वर्षांनी केईएममध्ये नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयात व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु झाल्यानंतर लवकरच नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित होणार आहे. जवळपास दहा वर्षांनी केईएम रुग्णालयाला पालिकेकडून नव्या सहा मशीन्स मिळाल्या आहेत. केईएमनंतर नायरलाआणि सायन रुग्णालयातही सोनोग्राफी प्रत्येकी चार मशीन्स येणार आहेत. 

केईएम रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात सध्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित आहेत. या मशीन्स दहा वर्षांपूर्वी आणल्या गेल्या होत्या. मशीन्स जुन्या झाल्याने कित्येक मशीन्स बंद राहत असल्याने गर्भवती महिलांना सोनोग्राफी सेवा वेळेवर देणे केईएम रुग्णालयासमोर आव्हान होऊन बसले होते. कित्येकदा दोन मशीन्स बंद राहत होत्या. त्यामुळे उरलेल्या चार मशीन्सवरही ताण येत होता. जुन्या मशीन्सची दुरुस्ती करुनही बंद पडण्याच्या घटना वाढत असल्याने अखेर वर्षभरापूर्वी नव्या सोनोग्राफी मशीन्सचे निविदा प्रक्रिया सुरु झाली. पालिकेच्या प्रमुख तिन्ही रुग्णालयांतील सोनोग्राफी मशीन्ससाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली.

त्यानुसार केईएमला सुमारे साडेतीन कोटीच्या सोनोग्राफी मशीन्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन मशीन्स मिळून दीड कोटी तर उर्वरित चार मशीन्सासाठी दोन कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. या नव्या सहा मशीन्स सुरु झाल्यानंतर दर दिवसाला येणा-या चारशे गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी गैरसोय होणार नाही, असा विश्‍वास केईएमकडून व्यक्त करण्यात आला. 

सोनोग्राफीच्या सहा नवीन मशीन्स केईएममध्ये आल्या आहेत. या मशीन्सला कार्यान्वित करण्यासाठी पीसीपीएनडीटी परवाना लागतो. त्याची प्रक्रिया सुरु आहे. 
- डॉ अविनाश सुपे, संचालक, पालिका वैद्यकीय रुग्णालये, प्रमुख, पालिका प्रमुख रुग्णालये तसेच अधिष्ठाता केईएम रुग्णालय

Web Title: New Six Sonography Machine in KEM Hospital