
महाराष्ट्रात होणार आदित्योदय...!' अशा ओळी असलेल्या या गाण्यात आदित्य ठाकरे यांची 'जन आशिर्वाद यात्रा' चा प्रवास दाखवण्यात आला आहे.
विधानसभा 2019 : मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी 'जन आशिर्वाद यात्रे' च्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केलीय.
Vidhan Sabha 2019 : गाण्यातून प्रचार
या यात्रेत आदित्य ठाकरे यांनी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी थेट जनतेत जाऊन त्यांचे आशिर्वाद मागितले होते. या संपूर्ण प्रवासाचे एक गाणं युवासेनेनं प्रसिद्ध केलंय. 'हिच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची...! महाराष्ट्रात होणार आदित्योदय...!' अशा ओळी असलेल्या या गाण्यात आदित्य ठाकरे यांची 'जन आशिर्वाद यात्रा' चा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Vidhan Sabha 2019 : उमेदवारीची घोषणा आज?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची आज अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आहे. या वेळाव्यात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून युवासेनाप्रमख आदित्य ठाकरे यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.आदित्य ठाकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तर ते निवडणुक लढवणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत.