मुंबईच्या सेवेसाठी राज्यभरातून  नव्या एसटी, कर्मचारी येणार! एकाच विभागावरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

मुंबईच्या सेवेसाठी राज्यभरातून  नव्या एसटी, कर्मचारी येणार! एकाच विभागावरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

मुंबई  : मुंबईतील बेस्ट उपक्रमात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर विभागाच्या एसटी बस प्रवाशांच्या सेवेसाठी बोलावण्यात आल्या आहेत. या विभागातील कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडू नये व त्यांना दिलासा मिळावा, यासाठी आता त्यांच्या जागी इतर विभागांतील एसटी बस व कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवेत बोलावण्यात येणार आहे. 
मुंबईसाठी कोणत्याही एका विभागावर ताण पडू नये, यासाठी विभाग आणि कर्मचारी पुरविणाऱ्या विभागांचा बदल करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे 14 जानेवारीपासून राज्यभरातील इतर 21 विभागांतील नवीन एक हजार गाड्या आणि कर्मचाऱ्यांना मुंबईत कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

एसटी महामंडळाने कोरोना काळात मुंबईतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एसटीच्या एक हजार बसेस पुरवल्या. यासाठी प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघरसह इतर विभागांतील बस मागविण्यात आल्या. आता त्यांची संख्या प्रचंड कमी करत इतर 21 विभागांतील एकूण एक हजार गाड्या मुंबईसाठी देण्यात येणार आहेत. त्यात धारावी बेस्ट आगारासाठी 25, मुलुंडसाठी 45, कन्नमवारसाठी 10, घाटकोपरसाठी 20, कुर्ला येथे 50, काळाकिल्लासाठी 50, मालवणीसाठी 45, मागाठणेसाठी 25, गोराईसाठी 25, मुंबई सेंट्रलसाठी 50, मालाडसाठी 25, वडाळासाठी 40, प्रतीक्षानगर 50, दिंडोशी 50, विक्रोळी 50, शिवाजीनगर 50, देवनार 60, वरळी 50, सांताक्रूझ 50, वांद्रे 25, गोरेगाव 50, बॅंकबे 50, घाटकोपर 60 आणि वांद्रे बेस्ट आगारामध्ये 25 बस देणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

विभागानुसार येणाऱ्या बस 
उस्मानाबाद - 55 
सोलापूर - 40 
परभणी - 50 
रायगड - 50 
मुंबई - 15 
ठाणे - 15 
पालघर - 15 
लातूर - 50 
औरंगाबाद - 75 
नाशिक - 65 
सांगली- 50 
सातारा - 50 
धुळे - 50 
जालना - 50 
पुणे - 85 
जळगाव - 50 
नांदेड - 75 
सिंधुदुर्ग - 50 
रत्नागिरी - 50 
अहमदनगर - 60 
बीड - 25 
एकूण - 1000 
New ST employees will come from all over the state for Mumbai service

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com