मुंबई उपनगरात उभे राहणार नवे नाट्यगृह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मुंबईच्या विकास आराखड्यातील तरतूदीनुसार कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्यातील तरतूदीनुसार कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही जागा खाजगी मालकीची असल्याने पालिकेकडून त्याचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.

या नाट्यगृहाचा लाभ कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि पवई येथील नाट्य रसिकांना होणार आहे. पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जवळपास नाट्यगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुंबईच्या विकास आराखड्यात कांजूरगाव येथील जमीन नाट्यगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे.

भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांनी ही जमीन नाट्यगृहासाठी संपादित करावी अशी मागणी केली होती. या मागणीवर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. ही जमीन खासगी मालकीची असल्याने पालिकेला भूसंपादन करून ताब्यात घ्यावी लागणार आहे. 
 

web title : New theater to open in Mumbai suburbs


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New theater to open in Mumbai suburbs