प्रदूषण मोजण्यासाठी नवे वाहन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

आणखी एका यंत्राचा विचार 
ठाणे महापालिकेने शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी बाह्यप्रदूषण नियंत्रण यंत्रणा (आऊटडोअर पोल्युशन कन्ट्रोल मशीन) बसवली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी करण्यात पालिकेला काही अंशी यश आले आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरात अशा प्रकारची यंत्रे बसवण्याची मागणी सभापती दिव्या गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र त्या संस्थेकडून यंत्रावर जाहिरात केली जाणार असल्याने निर्णय घेण्यात प्रशासनाकडून उशीर होत आहे. 

नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिका धुलिकण, धुरातून निघणारे विषारी घटक मोजण्यासाठी एक फिरते पथक तैनात करणार आहे. वाढत्या प्रदूषणाचा प्रश्‍न "सकाळ'ने सातत्याने मांडला आहे. 

शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेच्या बेलापूर, तुर्भे आणि ऐरोली येथे प्रयोगशाळा आहेत. या ठिकाणी निरिक्षणे नोंदवून त्यांचा अभ्यास करण्यात येतो. याव्यतिरिक्त प्रदूषण मोजण्यासाठी पालिकेकडे एक वाहनही आहे. मात्र त्यामधील तंत्रज्ञान जुने असल्याने त्याचा फिरते वाहन म्हणून उपयोग होत नाही. सध्या पालिकेला हवेच्या गुणवत्ता मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर अवलंबून राहावे लागत आहे. 

या स्थितीमुळे पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या गायकवाड यांनी प्रशासनाला एक अद्ययावत फिरते वाहन खरेदी करण्याचे सुचवले होते. त्यानुसार सुमारे 30 लाख रुपये खर्च करून एक वाहन खरेदी करण्यात येत आहे. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. 

या वाहनामुळे बेलापूरपासून अगदी दिघ्यापर्यंतच्या प्रदूषणाची पालिकेला तत्काळ माहिती मिळणार आहे. 

आणखी एका यंत्राचा विचार 
ठाणे महापालिकेने शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी बाह्यप्रदूषण नियंत्रण यंत्रणा (आऊटडोअर पोल्युशन कन्ट्रोल मशीन) बसवली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी करण्यात पालिकेला काही अंशी यश आले आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरात अशा प्रकारची यंत्रे बसवण्याची मागणी सभापती दिव्या गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र त्या संस्थेकडून यंत्रावर जाहिरात केली जाणार असल्याने निर्णय घेण्यात प्रशासनाकडून उशीर होत आहे. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New vehicles to measure pollution