PMC बॅंकेतून पैसे काढण्याची 'ही' आहे नवी मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा 50 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी (ता.5) घेतला. याशिवाय ग्राहकांना पीएमसी बॅंकेच्या "एटीएम"मधून पैसे काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. पीएमसी बॅंकेवर निर्बंध लादल्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत रिझर्व्ह बॅंकेने चौथ्यांदा पैसे काढण्यची मर्यादा वाढवली आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाला समकक्ष यंत्रणा उभारणार?

रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा 40 हजार रुपयांवरून 50 हजारांपर्यंत वाढववली. ठेवीदार तसेच ग्राहक आता 50 हजार रुपये एकरकमी किंवा टप्प्याटप्यात काढून घेऊ शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बुडीत कर्जांसंदर्भातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बॅंकेने 35 ए कलमाअंतर्गत 23 सप्टेंबर रोजी पीएमसी बॅंकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. सुरूवातीला ग्राहकांना बॅंक खात्यातून एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही मर्यादा 10 हजार, 25 हजार आणि 40 हजारांपर्यंत वाढवण्यात आली.

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

रिझर्व्ह बॅंकेकडून पीएमसी बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा नियमित आढावा घेतला जात असून ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने नजिकच्या काळात निर्बंध शिथिल होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

PMC चा आणखी एक बळी 

सोमवारी मुंबईतील PMC खातेदार  अॅड्र्यू लोबो या खातेदाराचा मृत्यू झालाय. लोबो यांचं मुंबईतील मुलुंडमधील शाखेत त्यांचं खातं होतं. लोबो यांची प्रकृती बरी नव्हती. यातच लोबो यांना त्यांच्या उपचारांसाठी पैसे न काढता आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या  कुटुंबियांकडून सांगितलं जातंय.  लोबो यांच्या नातवाने दिलेल्या माहितीत त्यांच्या खात्यात तब्बल 26 ते 30  असल्याचं समजतंय. लोबो यांनी नुकतंच त्यांचं घर आणि व्यवसाय विकून त्याचे पैसे PMC बँकेत जम केले होते. 

WebTitle : new withdrawal limit for PMC bank account holders

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new withdrawal limit for PMC bank account holders