नववर्षाच्या पार्टीमध्ये एकावर एक फ्री थाळी देऊ शकते लाखोंचा भुर्दंड,सायबर भामटे सक्रिय

नववर्षाच्या पार्टीमध्ये एकावर एक फ्री थाळी देऊ शकते लाखोंचा भुर्दंड,सायबर भामटे सक्रिय

मुंबईः  शॉपिंग करणं असो किंवा खाणंपिणं असो जिथं ऑफर असते तिथे प्रत्येक जण पळतो. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विक्रेते वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. त्याच्या जाहिराती करत असतात आणि ग्राहकही यांना भुलतात. कमीत कमी किंमतीत जास्त आणि चांगली वस्तू मिळवण्याचा प्रयत्न ग्राहकांचा असतो. पण कधीकधी पैसे बचत करण्याच्या नादात अशी ऑफर्सकडे वळणे चांगलेच महागात पडू शकते.

हीच मार्केटींगची पद्धत आता नववर्षाच्या स्वागतासाठी तैनात नागरिकांना फसवण्यासाठी सायबर चोरटे वापरत आहेत. सध्या अशा ऑनलाईन टोळ्या सक्रिय असून सायबर पोलिसांनी याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नववर्षे स्वागतानिमित्त सायबर चोरट्यांनी  जनतेची फसवणूक करण्यासाठी  मुंबईतील 5 आणि पुण्यातील 1 प्रसिध्द हॉटेल अथवा रेस्टॉरन्टमध्ये एका थाळीवर दोन थाळी फ्री अशा प्रकारची जाहिरात फेसबूकवर प्रसारीत केली आहे.

त्या प्रसिध्द हॉटेल रेस्टॉरन्टमध्ये बुकींग करण्यासाठी त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यावर रूपये 10  इतकी शुल्लक रक्कम भरण्यास सांगून ग्राहकांना एका लिंकव्दारे बुकिंगसाठी त्यांच्या बँक त्याची माहिती प्राप्त करून घेतली जाते. त्या माहितीच्या आधारे ग्राहकांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम लुटली जाते.

मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याने अशा भामट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर फेसबूक आणि इतर समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या ऑफर्सच्या लिंक येत असतील तरी त्यावर क्लिक करू नये. आपल्या बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशी शेअर करू नये. अशा प्रकारे फसवणुकीच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत आहेत.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

New Year party free plate dinner cyber attack mumbai fake news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com