महापौरपदासाठी 'मातोश्री'वर फिल्डिंग 

महापौरपदासाठी 'मातोश्री'वर फिल्डिंग
महापौरपदासाठी 'मातोश्री'वर फिल्डिंग

मुंबई ः मुंबईच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबईच्या महापौरपदाला मोठी प्रतिष्ठा असल्याने त्यासाठी शिवसेना नगरसेवकांमध्ये मोठी चुरस होणार आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवकांच्या हालचाली सुरू झाल्या असून "मातोश्री'वर त्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाल्याचे समजते. मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर आदी ज्येष्ठ नगरसेवकांची नावे महापौरपदासाठीच्या चर्चेत आघाडीवर आहेत.  

विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची महापौरपदाची मुदत 8 सप्टेंबर रोजी संपली होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांचा महापौरपदाचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आला. ती मुदही संपल्यानंतर महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत मोठा पक्ष असलेल्या इच्छुक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे समजते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते राज्यातील सत्ता समीकरणे जुळविण्यात मग्न आहेत. अशा परिस्थितीत महापौरपदाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे वरिष्ठांमार्फत "मातोश्री'ला इच्छुकांसाठी साकडे घालावे लागणार आहे. 

अनेक नावांमध्ये चुरस 
मुंबई महापालिकेत नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच महापौर होणार आहे. शिवसेनेत महापौरपदाचे अनेक दावेदार आहेत. महापौरपदाची संधी हुकलेल्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच होणार आहे. महापौरपदासाठी मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर आदी नावे आघाडीवर आहेत. जुन्या फळीतील शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांना विधानसभा निवडणुकीत केलेली बंडखोरी भोवणार का, याची चर्चा सुरू आहे. माजी महापौर आणि विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर आदींची नावेही चर्चेत आहे; परंतु ऐनवेळी "टीम आदित्य ठाकरे'मधील नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यास ज्येष्ठ सदस्यांना पुन्हा एकदा वेटिंगवर राहावे लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com