नवी मुंबईकरांना कोरोनाच्या धाकातून दिलासा देणारी बातमी, पण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

नवी मुंबई शहरात सध्या 9 हजार 943 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7311 लोकांच्या चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नवी मुंबई : शहरात आज एकाच दिवसात तब्बल 102 जणांची कोरोनातून मुक्तता झाली. यातील काही लोक संस्थात्मक विलगीकरण तर काही महापालिकेच्या रुग्णालयात होते. आज आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालानुसार दोन जणांचा मृत्यू झाला, तर 74 नव्या रुग्णांची वाढ झाल्याने संख्या एक हजार 561 पर्यंत पोहोचली. 

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

नवी मुंबई शहरात सध्या 9 हजार 943 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7311 लोकांच्या चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एक हजार 561 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून 102 जणांचे निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मार्चपासून 722 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 51 पर्यंत गेला आहे.

News that reassures Navi Mumbaikars out of fear of corona, but


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News that reassures Navi Mumbaikars out of fear of corona, but