वृत्तपत्रांसाठी नव्या जाहिरात धोरणास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - वृत्तपत्रांसाठी शासकीय जाहिरात धोरण निश्‍चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा जाहिरात दरवाढीचा प्रस्ताव स्वीकारून महत्त्वपूर्ण अशा नव्या जाहिरात धोरणाला मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाचे हे जाहिरात धोरण ऐतिहासिक आहे, देशात असे धोरण निश्‍चित करण्यात महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असे नमूद करून वृत्तपत्र संघटनांच्या संपादक- प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांबाबत वृत्तपत्र संघटनांचे संपादक- प्रतिनिधी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Web Title: Newspaper New Advertise Policy