मराठा क्रांती मोर्चाचे पुढील आंदोलन जाहिर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची मिटिंग शिवाजी मंदीर दादर येथे आज घेण्यात आली. सदर बैठकीमधे खालील ठराव घेवून पुढील आंदोलन जाहीर करण्यात आले.

- २५ जुलै बंद दरम्यान दाखल केलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.

- कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. व त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे.

- मुख्यमंत्री यांनी आंदोलकांना चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला सकल मराठा समाज च्या वतीने कोणीही नेता, समन्वयक यांनी चर्चेला जायचे नाही. (चर्चेला जाणाऱ्यांना समाज धडा शिकवेल कारण मुख्यमंत्री यांना सर्व मागण्या माहित आहेत. त्यावर ठोस निर्णय घ्यावेत. उगीच आंदोलकांमधे फुट पाडू नये.)

- मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंशेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा.

- दोन दिवसात सदर मागण्यांवर कारवाई झाली नाही तर मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र भरात १ ऑगस्ट २०१८ पासून जेल भरो आंदोलन सुरु होईल. असे ठराव घेवून पुढील आंदोलनासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज महामुंबई च्या वतीने करण्यात आले.
 
Web Title: The next movement of the Maratha Kranti Morcha