esakal | चेस द व्हायरसचा पुढचा टप्पा! जेष्ट नागरीकांसह, दिर्घकालीन आजार असल्यांची कोव्हिड चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

चेस द व्हायरसचा पुढचा टप्पा! जेष्ट नागरीकांसह, दिर्घकालीन आजार असल्यांची कोव्हिड चाचणी

कोव्हिडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी महानगर पालिकेने सात प्रभागांमध्ये चेस ते व्हायर या मोहिमेचे पुढील टप्पा सुरु केला आहे.

चेस द व्हायरसचा पुढचा टप्पा! जेष्ट नागरीकांसह, दिर्घकालीन आजार असल्यांची कोव्हिड चाचणी

sakal_logo
By
समीर सुर्वेमुंबई : कोव्हिडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी महानगर पालिकेने सात प्रभागांमध्ये चेस ते व्हायर या मोहिमेचे पुढील टप्पा सुरु केला आहे.सात प्रभागातील कर्करोगाचे रुग्ण, 50 वर्षांवरील जेष्ट नागरीक, दिर्घकालीन आजार असलेले रुग्ण आणि प्रतिबंधीत क्षेत्रात राहाणाऱ्या व्यक्तींची मोफत ऍण्टिजेन चाचणी करण्यास सुरवात केली आहे. यात, सात प्रभागांमध्ये मिळून रोज 1 हजारच्या आसपास चाचण्यात होत आहेत.17 ऑगस्टच्या नोंदी नुसार मुंबईत कोविडमुळे 7170 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 82 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण 50 वर्षावरील वयोगटातील आहेत.तर,मृत्यूदर 5.54 टक्के आहे.

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

चेस द व्हायरस मोहीमेत महानगर पालिकेने संशयीत रुग्ण शोधून त्यांची चाचणी करण्यास सुरवात केली होती.त्यामुळे कोव्हिडचे संक्रमण नियंत्रणात आणण्यात महानगर पालिकेला यश आले आहे.आता एन,एस,टी घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड या पुर्व उपनगरातील भागासह पी उत्तर ,पी दक्षिण,आर दक्षिण,आर मध्य आणि आर उत्तर या मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागात ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या भागांमध्ये जुलै महिन्यात कोविडचे संक्रमण वाढले होते. तेथे चेस द व्हायरच ही मोहिम राबविण्यास सुरवात केली होती. त्यामुळे कोव्हिड संक्रमण नियंत्रणात आले. मात्र, सेरो सर्वेक्षणात झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के नागरीकांना कोविडची बाधा होऊन गेल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. या नागरीकांमध्ये कोविड सदृष्य कोणतीही लक्षणं आढळली नाही.मात्र, त्यांच्यापासून इतरांना बाधा होण्याची शक्‍यता लक्षात घेता.पालिकेने आता ऍण्टिजेन चाचणीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

एन,एस,टी या प्रभागात रोज 500 मोफत चाचण्या होत असल्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.यामुळे कोविडची बाधा हाता बाहेर जाण्यापुर्वी रुग्ण आढळून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यास प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमुद केले.

ब्रेकिंग : सुशांत सिंह प्रकरण, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा, मुंबईत मोठ्या घडामोडी

हे निकष का
- 50 वर्षांवरील व्यक्तींची चाचणी - मुंबईत 17 ऑगस्ट पर्यंत 1 लाख 29 हजार 479 रुग्ण आढळले होते.त्या पैकी 52 हजार 369 रुग्ण हे 50 वर्षावरील होते.तर,7 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 5 हजार 943 रुग्ण हे 50 वर्षावरील होते.50 वर्षावयाच्या पुढे मृत्यूदर जास्त असल्याने त्यांची प्राधान्यांने चाचणी करण्यात येत आहेत.

- दिर्घकालीन आजार- कर्करोगासह मधुमेह,रक्तदाब,अस्थमा असे दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना कोविडची बाधा होऊन त्यांचा मृत्यू होण्याची शक्‍यता अधिक असते.
-प्रतिबंधीत क्षेत्र - प्रतिबंधीत वस्त्या आणि सिल इमारतींमध्ये यापुर्वी कोविडचे रुग्ण आढळले असल्याने तेथील नागरीकांना बांधा झालेली असून शकते.

- फ्ल्यू सदृष्य लक्षणं - कोविडची बाधा झाल्यानंतर ताप,सर्दी,खोकला श्‍वास घ्यायला त्रास अशी प्राथमिक लक्षणं दिसतात.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top